Monday, 9 April 2012

पाण्याचा एक थेंब....

पाण्याचा एक थेंब....


अळवावर पडला कि मोहरून चमकतो मोत्याप्रमाणे, 
तोच  मोती, जो  असाच  एक  थेंबशिंपल्याने  आपल्या  ऊरात जपला  की  तयार  होतो ,


ऊरात जपलेले,  कोंडलेले  दुःख ,  कधी  नकळत  बाहेर  डोकावू  लागले  की  
एक  पाण्याचा ..अश्रूचा थेंब  कधी  नुसताच  पापण्यांच्या  दाराशी  थांबतो , 
तर  कधी  अनावर  होऊन  गालांवरनं  घरंगळतो  , 


ढगातून घरंगळणारे  ते  असंख्य पाण्याचे  थेंब , एकत्र  गर्दी  करून ,

कधी  संथ  जलाशयाचं रूप  घेतात , तर  कधी  झाडाझुडपातून , दऱ्याखोऱ्यातून   वाट काढत  
बंधनं  झुगारून  नदी  बनून  धावत  सुटतात ...



असेच  आपणही  कधीतरी  एखादी  शर्यत  जिंकायला  धावत  सुटतो  तेव्हा , किंवा  कधी  मेहनतीचा  एक  रुपया  कमवायला  कष्ट  करतो ,
तेव्हा  त्या  मेहनतीची , जिद्दीची , कष्टाची  छोटीशी  गाथा सांगतो  तो  कपाळावर  लुकलुकणारा  घामाचा  एक  थेंब ...


म्हणायला  एक  पाण्याचा  थेंब , पण  तहानलेल्यासाठी    तो  जगण्याचा  आधार  होऊ  शकतो ,
विषात घोळला  तर  मृत्युचं कारण  होऊ  शकतो ....


विचार  आणि  बुद्धी  ही  या  पाण्याच्या  थेम्बासारखी आहे , जशी  वापराल , जिथे  वापराल , ज्या  वातावरणात  मिसळवाल  तशी  ती  मिसळते   
आणि  आपण  असतो  तो  विषाचा  थेंब  जो  विनाश  घडवतो , 
किंवा  तो  पवित्र  शिंपला  जो  मोती  चमकवतो ....

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home